शिवसेना नेते हारून खान यांच्या अथक प्रयत्नाला यश पार्क साईट च्या रायगड विभागात नियमित पिण्याची सुविधी…

धीरज घोलप

गेली १० वर्षे पार्क साईट मधील रायगड विभागातील रहिवाश्यांना अक्षरशः खड्यातून पाणी भरावे लागत होते.२०१७ ला या प्रभागाची विभागणी होऊन रायगड हा विभाग शिवसेना नेते हारून खान यांच्या कडे समाविष्ट झाला.

नगरसेवक पदी त्यांच्या पत्नी निवडून आल्यानंतर हारून खान आणि ज्योती खान यांनी या विभागाची पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की रायगड विभागातील लोकांना पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.

हे समजल्यावर यांनी सतत ४ वर्ष बी एम सी अधिकाऱ्यांना भेटून कागदोपत्री चा पाठपुरावा करून वारंवार अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन १२ इंचाची पाईप लाइन टाकून घेतली. आणि आज त्याच पाईप लाईन ला 6 इंचाची लाईन जोडून देण्यात आली.रायगड विभागातील लोकांची कित्येक वर्षाची तहान आज या शिवसेना नेत्यानी भागवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here