शहरातील पेटस शॉप नोंदणी करणे अनिवार्य…नाहीतर व्यवसाय होणार बंद

फोटो - सौजन्य गुगल

न्यूज डेस्क – पाळीव प्राण्यांच्या व पक्षांच्या दुकानाच्या आता तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक असून जर केली नसल्यास कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपण घरी पाळीव प्राणी व पक्षी यांना घरात ठेवताय तर त्याचीही नोंदणी करावी लागेल. या संदर्भात पशु कल्याण मंडळाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नागपूरचे पशु कल्याण अधिकारी यांनी आता परवानगी शिवाय पाळीव प्राण्यांचे दुकाने आणि कुत्री पैदास करणारे व्यवसायी यांचा शोध सुरु केला असून लवकरच इतर जिल्ह्यातही ही मोहीम राबविणार.

कारवाईसाठी नागपूर व अमरावती शहराच्या विविध ठिकाणी सुमारे पाळीव सुमारे 370 च्या वर दुकाने व घरून व्यवसाय करतात अशी माहिती अधिकाऱ्यांना असल्याचे समजते. लॉकडाउन उघडण्यापूर्वीच बेकायदेशीरपणे कुत्री, पक्षी विकल्या जातात. सोबतच पाळीव प्राण्यांना पिंजऱ्यात डांबून ठेवतात अश्या लोकांवर कारवाई होणार आहे. व्यवसाय करणार्यांनी नोंदणी करण्यास सांगितले, अन्यथा कारवाई केल्या जाईल.

आपणाकडे नोंदणी नसेल तर संबंधित विभागाच्या वतीने कारवाई होईल. या संदर्भात आमच्या पथकाचे लक्ष वेधून घेतल्यानंतर भारतीय कल्याण मंडळाने या संदर्भात पशु प्राण्यांच्या भारतीय प्राण्यांची दुकाने शोधण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या संदर्भात अधिक माहिती लागल्यास कवल पांडे, सदस्य,WAPI- मोबाईल नं 7038498030

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here