विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने रामतीर्थ सबस्टेशन वरील भार कमी करा – जि.प.सदस्या डाँ.मिनलताई खतगावकर…

नांदेड – महेंद्र गायकवाड

बिलोली तालुक्यातील रामतीर्थ १३२ के.वी. सबस्टेशनवर मर्यादेपेक्षा जास्त ताण येत असल्याने रामतिर्थ परिसरातील विजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. शंकरनगर फिडरवर जोडलेली काही गावे रुद्रापूर फिडरला जोडून रामतिर्थ सबस्टेशनचा भार कमी करण्याची मागणी जि.प.सदस्या डाँ मिनलताई खतगावकर यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंताकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बिलोली तालुक्यातील रामतिर्थ १३२ सबस्टेशनवरुन परिसरातील अठ्ठेचाळीस किमी अंतरावर विजपुरवठा केला जातो.मर्यादेपेक्षा जास्त विजपुरवठा होत असल्याने शंकरनगर फिडरवर ताण येत असल्याने वारंवार विजपुरवठा खंडित होत आहे.शंकरनगर फिडरद्वारे शंकरनगर,हिप्परगा माळ,किनाळा,

डोणगाव(खु),बिजूर,कामरसपल्ली,डोणगाव(बु),चिटमोगरा,जिगळा१,केरुर,जिगळा२,धुप्पा,जिगळा३ ही गावे जोडलेली आहेत.जास्तीच्या अंतरामुळे फिडरवर प्रेशर येत असल्याने विजपुरवठा खंडित होत असल्याने अडचणी वाढत आहेत.

कासराळी सबस्टेशन पासून रुद्रापूर फिडर पासून लिंक लाईनचे काम डिपीडीसी अंतर्गत मंजूर आहे.कंञाटदाराच्या संथपणामुळे काम पुर्ण होण्यास उशिर होत आहे.शंकरनगर फिडरवरील डोणगाव(खु),केरुर,डोणगाव(बु),केरुर,चिटमोगरा,कामरसपल्ली,बिजूर ही गावे रुद्रापूर फिडरला जोडून शंकरनगर फिडरवरील ताण कमी करण्याची मागणी रामतिर्थ जि.प.गटाच्या सदस्या डाँ मिनलताई खतगावकर यांनी अधिक्षक अभियंता यांच्याकडे केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here