आघाडी सरकारचा मोठा निर्णय…राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती…अनिल देशमुखांची माहिती

न्यूज डेस्क – राज्यात एकीकडे कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असताना नोकरीच्या संधी कमी होत असताना ठाकरे सरकारने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करणार असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून ,नोकरीची संधी शोधणाऱ्या राज्यातील तरुण-तरुणींना दिलासा देणारा आहे.

याआधी पोलीस दलात १०,००० जागांची भरती करण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं. अजित पवार यांनी जुलैमध्ये तशी माहिती दिली होती. “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली होती.

अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती कऱण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी मोठी भरती होणार आहे.

पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांनी पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here