राज्यात आरोग्य विभागात ३४६६ जागांवर भरती…असा करा अर्ज…

न्यूज डेस्क – देशात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये घट नोंदवल्यानंतर, पूर्वीप्रमाणेच विविध सरकारी विभागांद्वारे भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकार कडून महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये तब्बल 3466 जागांसाठी लवकरच मेगाभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

हि भरती ग्रुप – D च्या एकूण 3466 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याच्या तारीख 9 ऑगस्ट उद्यापासून सुरुवात होणार असून शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं संबंधित शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. येथे क्लिक करून आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करा.

नोकरीचं ठिकाण

ठाणे, पालघर, अलिबाग रायगड, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, जालना, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा,गोंदिया, चंद्रपूर, पुणे .

अर्ज सुरु होण्याची तारीख – 09 ऑगस्ट 2021

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here