अँटेलिया प्रकरण | सचिन वाझे यांना घेवून घटनास्थळी क्राइम सीन रिक्रिएट…त्या रात्री काय घडलं?

फोटो -सौजन्य ANI

न्यूज डेस्क – रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ बेवारस कारमध्ये ठेवण्याच्या प्रकरणात लिंक जोडण्यासाठी एनआयएची टीम शुक्रवारी येथे पोहोचली. या प्रकरणातील आरोपी मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यासमवेत शुक्रवारी रात्री 10.40 वाजता एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी एनआयएकडून या ठिकाणी नाट्य रुपांतर करत संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

२५ फेब्रुवारीला अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडी बेवारस अवस्थेत आढळली. पुढे त्यात अडीच किलो जिलेटीन आणि अंबानी कुटुंबाला धमकावणारी चिठ्ठी आढळली. या परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाचे विश्लेषण केले असता ही स्कॉर्पिओ वाझे यांनी चालवत आणली आणि अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ, कारमायकल रोडवर उभी केली, असा संशय ‘एनआयए’ला आहे. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर एनआयएने हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून आपल्याकडे घेतलं असून तपास सुरु आहे.

एनआयएने सचिन वाझे यांना स्कॉर्पिओ सापडली तिथपर्यंत चालायला लावसं. आधी सचिन वाझेंना शर्ट आणि पँटमध्ये चालायला सांगण्यात आलं. नंतर त्यांना कुर्ता आणि डोक्याला रुमाल बांधून चालायला लावण्यात आलं. सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती आणि सचिन वाझे यांच्यातील साधर्म्या तपासण्याचा प्रयत्न एनआयकडून करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

एनआयएने सचिन वाझे वापरत असलेल्या वाहनात गाडीची नंबरप्लेट सापडल्याचा दावा केला आहे. तसंच अँटिलियाबाहेर त्या रात्री सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचाही दावा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here