इंडिया बुक ऑफ रेकाॅर्डद्वारे डाॅ.अंशुजा किंमतकर यांच्या विक्रमाची नोंद…

सलग २४ तासात टाकावू वस्तुंच्या वापरातून बनवली तब्बल ५०२ शुभेच्छापत्रे.

रामटेक – राजू कापसे

रामटेकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी कामगिरी करणार्‍या आणि विश्वविक्रमाच्या नकाशावर रामटेकचे नाव कोरणार्‍या डाॅ.अंशुजा किंमतकर यांच्या विश्वविक्रमाची दखल “इंडिया बुक ऑफ रेकाॅर्डस”द्वारे दखल घेण्यात आली आहे.नुकतेच त्याचे प्रमाणपत्र,पदक डाॅ.अंशुजा किंमतकर यांना प्राप्त झाले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आभासी पुरस्कार प्रदान समारंभात हा पुरस्कार वितरित करण्यात आला.

रामटेक येथील प्रसिद्ध स्रि रोगतज्ञ डाॅ.अंशुजा किंमतकर या त्यांच्या शुभेच्छापत्रे निर्मिण्याच्या आपल्या आवडत्या छंदासाठी व्यस्त वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढतात.महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी आपला हा छंद जोपासला आहे.त्यांच्या संग्रही आजमितिस ३००० पेक्षा जास्त हस्तनिर्मित शुभेच्छापत्रे आहेत.

विशेष म्हणजे ही शुभेच्छापत्रे चाॅकलेट रॅपर,पक्ष्यांची पिसे,लग्नपत्रिका,वाढदिवस निमंत्रण पत्रिका,कापडाचे तुकडे, आगपेटीतील काड्या, आणि अनेक टाकावू वस्तूंपासून निर्मिण्यात त्या पारंगत आहेत.शुभेच्छापत्रांतून सामाजिक संदेशदेखिल देण्याचे काम त्या करतात.याव्यतिरिक्त डाॅ.अंशुजा या उत्तम कवयित्री,लेखिका आहेत.

सामाजिक संदेश देणारी अनेक पथनाट्ये लिहून त्यांचे प्रभावी सादरीकरण देखील त्या करतात.त्यांची पथनाट्ये जि.प.नागपुर ,दैनिक सकाळच्या वर्धापन दिनानिमित्त वसंतराव देशपांडे सभागृह येथेसुद्धा सादर करण्यात आली आहेत.दि. १९ व २० एप्रिल २०१९ रोजी वर्ल्ड रेकाॅर्डस इंडिया च्या बॅनरखाली सलग २४ तासात ५०२ शुभेच्छापत्रे तयार करून विश्वविक्रम केला.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वर्णेकर सभागृहात रामटेक येथे त्यांनी हा विश्वविक्रम केला.त्या विश्वविक्रमाची दखल आता “इंडिया बुक आॅफ रेकाॅर्डस” द्वारे घेण्यात आली आहे.त्याचे प्रशस्तीपत्र,पदक आणि इतर भेटवस्तू त्यांना नुकत्याच आभासी सोहळ्यात प्रदान करण्यात आलीत.

याकामी त्यांचे पती श्री समर्थ शिक्षण मंडळाचे सहसचिव रूषिकेश किंमतकर,सासू स्वतंत्र महिला सह.पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती कुसुमताई किंमतकर,मुले प्रथमेश व अभंग किंमतकर आई हेमाताई डाबरे यांचा सक्रिय पाठिंबा व सहकार्य लाभले आहे.

त्यांच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल आमदार आशिषबाबू जयस्वाल,नगराध्यक्ष दिलिप देशमुख, जिल्हा काॅंग्रेसचे महासचिव उदयसिंग (गज्जू) यादव,प्रहारचे जिल्हा संपर्कप्रमुख रमेश कारामोरे,ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शैलेंद्र किंमतकर,

श्री समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसाद किंमतकर,सचिव भारतभाऊ किंमतकर,माजी सरपंच तथा तनिष्का व्यासपिठ-शितलवाडीच्या समन्वयक योगिता गायकवाड ,महाराष्र्ट राज्य पत्रकार संघाचे जिल्हा तथा तालुका पदाधिकारी ,न.प.विरोधीपक्षनेता सुमित कोठारी आणि इतरांनी डाॅ.अंशुजा किंमतकर यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here