१८ ते ४४ वर्ष वयोगटाकरीता Covaxin लस प्राप्त…

अकोला- 18 ते 44 वर्ष वयोगटातील व्यक्तीना लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार आज कोव्हॅक्सीन लसीचे एकूण 12 हजार डोस प्राप्त झाले आहे. 18 ते 44 वर्ष वयोगटातील व्यक्तीने लसीकरणे करण्याकरीता आरोग्य सेतु किंवा कोविन ॲपवर आपली नोंदणी करुन अपॉईंटमेंट शेड्युल करणे आवश्यक असून नोंदणी झालेल्या व्यक्तीनाच लसीकरण होणार असल्याचे माहिती माता बाल संगोपण अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांनी दिली आहे.

कोव्हॅक्सीन लस ही ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व महानगरपालिका याच ठिकाणी देण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी wwwselfregistration.cowin.gov.in या वेबसाईडवर रजिस्ट्रेशन करुन अपॉईंटमेंट शेड्युल करावी. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरीकांकरीता 45 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांकरीता एकूण आठ हजार कोविशिल्ड व्हॅक्सीन प्राप्त झाले आहेत.

यामध्ये 70 टक्के लस दुसरा डोज देण्यात येणार आहे. तसेच 30 टक्के लस ही पहिला डोज देण्यात येणार आहे. तसेच 45 वर्षावरील नागरीकांसाठी सद्या कोव्हॅक्सीन चा साठा पुढील आठवड्यात प्रात होताच त्यानुसार सत्राचे नियोजन करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here