समाजकार्य महाविद्यालय बडनेरा येथे ‘संविधान दिनानिमित्त उद्देश पत्रिकेचे वाचन…

अमरावती – विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी द्वारा संचालित, समाजकार्य महाविद्यालय बडनेरा, अमरावती येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागामार्फत “संविधान दिनानिमित्त उद्देश पत्रिकेचे वाचन” कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक डॉ. राजकुमार दासरवाड, कार्यक्रम अधिकारी-राष्ट्रीय सेवा योजना,

समाजकार्य महाविद्यालय बडनेरा यांनी केले व संविधानाने मानवाला दिलेले अधिकार आणि संविधान दिनाचे महत्व सांगितले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. टी. एस. राठोड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प व हारार्पण करून अभिवादन केले आणि संविधान उद्देश पत्रिकेच्या वाचनास सुरुवात केले.

तसेंच कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. शिवाजी तुप्पेकर यांची उपस्थिती होती आणि तसेंच कार्यक्रमाला महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक डॉ. विशाल गजभिये, ग्रंथपाल डॉ. अनिता पाटील व प्रा. मेघा कनाटे यांची कार्यक्रमात उपस्थिती होती.

सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. हर्षल इंगोले, श्री. महेश गभने, श्री. रुपेंद्र आत्राम, श्री. राजेश तायडे, इत्यादी शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी विशेष सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे, सदरील कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे डॉ. राजकुमार दासरवाड यांनी मांडले आहे. तसेंच संविधान दिनाचे कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वी संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here