महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सोशल मिडीया राज्य समन्वयक पदी प्रा.शिल्पा बोडखे यांची फेरनियुक्ती…

न्यूज डेस्क – महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या सोशल मिडीया राज्य समन्वयक पदी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या महासचिव प्रा.शिल्पा बोडखे यांची फेरनियुक्ती झाली आहे.

प्रा.शिल्पा बोडखे ह्या मागील 15 वर्षापासून काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करत आहे त्यांनी नागपूर शहर ओबीसी विभाग काँग्रेस कमिटी त देखील काम केले असून मागिल पाच वर्षापासून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी सचिव पदी काम केले आहे आता तेथे शिल्पा बोडखे यांची महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

शिल्पा बोडखे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या सोशल मिडीया विभाग राज्य समन्वयक पदावर मागे देखील अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी नेमणूक केली होती.

शिल्पा बोडखे ह्या सोशल मिडीया च्या माध्यमातून जनतेच्या निगडीत समस्या नेहमी उचलून धरतात तसेच भाजपा वर टिका करण्याची व भाजपा च्या चुकीच्या गोष्टींना जनते समोर आणण्याची एक देखील संधी सोडत नाहीत आता अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटी प्रा. शिल्पा बोडखे यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या सोशल मिडीया राज्य समन्वयक पदावर फेरनियुक्ती केली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here