राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी दानापूर पावन भूमीत साजरी…

दानापूर – गोपाल विरघट

तेल्हारा तालुक्यातील वाण नदीच्या तीरावर वसलेल्या दानापूर येथे मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 53 वा पुण्यतिथी महोत्सव आजपासून सुरू झाला.सदर महोत्सव हा 2 दिवस चालनार आहे.यावेळी सर्वप्रथम दि.25 ला सकाळी 5 वा, आथिस्मरकाचे जलाभिषेक करून तिर्थ स्थापना करण्यात आली.

नंतर ध्यानाचा कार्यक्रम, ध्यानावर श्री.इंगळे गुरुजी यांचे चिंतन रामधन, ग्रामसफाई, श्री गुरुदेव भजन मंडळ यांचा खंजेरी भजनाचा कार्यक्रम दुपारी 4, वा 58 मिनिटांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (मोझरी येथे होतो त्याच वेळी) यांना मौन श्रद्धांजली यावेळी अर्पण करण्यात आली.यावेळी कोरोना नियमांचे पालन करून सोबत अतिशय शिस्थ बद्ध पद्धतीने महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी महाराजांचे अस्थी स्मारक फुलांनी सजविण्यात आले होते.

रात्री भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या मध्ये युवा गायनाचार्य, योगेश महाराज, दिनेश महाराज (कवठळकर) सागर महाराज (दानापूर ) यांचा कार्यक्रम संपन्न झाला.दानापूर नगरीचे भाग्य महाराजांचे अस्थी स्मारक दानापूर नगरीत मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने दानापूर नगरी पुनीत झाली असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी 1948 साली दानापूर नगरीत भेट दिली होती.

त्यावेळी त्यांनी आपल्या भजनाच्या कार्यक्रमातून गावात मोठया प्रमाणावर जनजागृती करून गावात गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करून विशेषतः युवा पिढीला या मध्ये समाविष्ट करण्यावर विशेष भर दिला.अविरत भजन कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांनी आपले आयुष्य समाजासाठी अर्पण केले. त्यातच महाराजांचे 9 नोव्हेंबर 1968 रोजी निधन झाले.यावेळी सर्व समाज महाराजा पासून पोरका झाला.

महाराजांची कर्मभूमी असलेल्या मोझरी येथे तर अस्थी स्मारकाचा मान अकोला जिल्ह्याला मिळाला यामध्ये दानापूर, पाटसुल, राजदा याठिकाणी महाराजांच्या अस्थी स्मारक असू असून ते आजही महाराजांची आठवण करून देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here