उपप्रादेशिक परिवहन मंडळ(आर टी ओ) सांगली कार्यालयासमोर राष्ट्र विकास सेनेकडून निदर्शने…

सांगली – ज्योती मोरे

सांगली शहर व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चारचाकी व दुचाकी गाड्यांच्या शोरूम मधून सर्रासपणे पासिंग न करता तसेच गाडी घेणाऱ्या ग्राहकाचे ड्रायव्हिंग लायसन्स नसताना ही बेकायदेशीर गाड्या दिल्या जातात,त्याच बरोबर आर टी ओ कडून गाडी घेणाऱ्या ग्राहकाचे ड्रायव्हिंग लायसन्स नसतानाही सर्रासपणे बेकायदेशीर गाड्या पासिंग करून दिल्या जातात,

ग्रामीण भागात एक एक महिना गाड्या पासिंग होत नाहीत,पासिंग न करता गाडी ग्राहकांना दिल्या जातात अचानक कुठे अपघात झाला तर त्या गाडीमालकाच्या गाडीचे नुकसान झाले किंवा जिवीत हानी झाली तर पासिंग नसल्याने इन्शुरन्स झालेला नसतो मग त्या ग्राहकाला इन्शुरन्स नसल्याने पैसे मिळत नाहीत व गाडी ची नुकसानभरपाई ही मिळत नाही,

यासाठी संबंधित आर टी ओ अधिकारी व गाड्या शोरूम मालकांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत व कारवाई करण्यात यावी ही मागणी प्रशांतभाऊ सदामते यांनी केली,जोरदार घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली ,यावेळी .विनोद मोरे जिल्हा अध्यक्ष सांगली,सारिका जमदाडे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सांगली,

महेश महाजन उपाध्यक्ष,शशिकांत दुधाळ सचिव, संदीप देवकते, प्रदीप पाटील, मा यासिन मुश्रीफ कार्यध्यक्ष, महेश चेंडके, फर्याद सय्यद, संदीप माने कुपवाड शहर अध्यक्ष, अनिता माने महिला आघाडी शिरोळ तालुका अध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here