सांगली जिल्ह्यात बोगस कामगारांची नोंदणी, संबंधीतांवर कारवाईची राष्ट्र विकास सेनेची मागणी…

सांगली – ज्योती मोरे

बांधकाम कामगार मजूर नोंदणी ही सांगली जिल्ह्यात बोगस पण एक होत आहे असा आरोप राष्ट्रीय विकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी केला आहे.
सदर नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात बेकायदेशीर एजंट लोकांचा सुळसुळाट झाला असून त्यांनी आपापली कार्यालयात टाकलेली आहेत.

ही नोंदणी करण्यासाठी ते लोकांकडून हजारो रुपये उकळत आहेत. त्यामुळे खरे बांधकाम कामगार वंचित राहत आहेत. या एजंटांची आणि ठेकेदार तसेच इंजिनियर आणि अधिकारी यांची हातमिळवणी असून, या बेकायदेशीर आणि बोगस नोंदण्या केल्या जात आहेत.

दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील झालेल्या नोंदणीची ऑडिट झालं पाहिजे कामगार आयुक्त संबंधित अधिकारी यांची चौकशी झाली पाहिजे, तसेच एजंट लोकांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. अशी राष्ट्रविकास सेनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. जर येत्या काळात त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर, राष्ट्रविकास सेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही प्रशांत सदामते यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here