अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकांसह, संस्थेवर कारवाईची राष्ट्र विकास सेनेची मागणी…

सांगली – ज्योती मोरे

वसगडे येथील जय भारत शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी सुरू केलेली अश्लील शिक्षण पद्धती , लहान मुलांना ऑनलाईन शिक्षण देताना शिक्षकांकडून शिक्षिके साठी वापरलेल्या सांकेतिक प्रेमाच्या खाणाखुणा, तसंच इतर भाषा वापरून मुलांना ऑनलाईन शिक्षण देताना शिक्षकांनी व्यक्त केलेले शिक्षिकेवरचे प्रेम. या आणि इतर सर्व बेकायदेशीर बाबी ज्यामुळे लहान मुलांवर होणारे वाईट परिणाम, त्यांच्या भविष्याचे होणारे नुकसान, त्यांचेवर होणारे खराब संस्कार या सर्व गोष्टी गांभीर्याने घेतल्या जाव्यात,

तसंच सदर चाळे करणारे शिक्षक आणि शिक्षिका यांच्यावर कारवाई व्हावी. नमूद शिक्षण संस्थेतील सर्व पदाधिकारी ज्यांनी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकांना आणि त्यांच्या अश्लील कृत्यांना पाठीशी घातलं. त्यांच्यावर कारवाई होऊन, जय भारत शिक्षण संस्थेचा परवाना रद्द करण्यात यावा यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, राष्ट्र विकास सेनेच्या वतीनं – प्रदेश अध्यक्ष ,अमोस मोरे, यांच्या नेतृत्वाखाली, युवक प्रदेश अध्यक्ष ,प्रशांत सदामते यांच्या उपस्थितीत एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.

अमोस मोरे

नमूद शिक्षक ,शिक्षिका, संस्था आणि संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या विरूध्द कारवाई करण्यात दिरंगाई केल्यास राष्ट्र विकास सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश अध्यक्ष अमोस मोरे यांनी यावेळी दिलाय.सदर आंदोलनास राष्ट्र विकास सेनेच्या वतीने पक्षाचे युवा नेते मा. सिद्धू गायकवाड, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सारिका जमदाडे, सांगली जिल्हा वाहतूक संघटना अध्यक्ष महेश चेंडके, पक्षाचे कायदे विषयक सल्लागार ॲड. सचिन गायकवाड ,मिरज तालुका अध्यक्षा सुनिता खटावकर तसंच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here