गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी फरार…

मनोर पोलीस ठाणे हद्दीतील बांगरचोळे गावातील घटना.

मनोर – नविद शेख

पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाणे हद्दीच्या बांगरचोळे गावात बुधवारी (ता.21) गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

अल्पवयीन मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला जबरदस्तीने झाडीत ओढून नेत बलात्कार करण्यात आला आहे. आरोपी हा अत्याचारग्रस्त मुलीचा नातेवाईक असल्याची माहिती पुढे येत आहे.याप्रकरणी आरोपी विरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.

विक्रमगड तालुक्यातील बांगरचोळे गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी बुधवारी सायंकाळी गुरे चारण्यासाठी जंगलात गेली होती.यावेळी मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपी संजय मधुकर तांबडी (वय.22)याने तिला जबरदस्तीने झाडीत ओढून नेत बलात्कार केला.

घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी आरोपीने अत्याचार झालेल्या मुलीला दिली होती. त्यामुळे घाबरल्याने तिने घडलेला प्रकाराची माहिती घरच्यांना दिली नाही.शुक्रवारी घडलेल्या घटनेची माहिती तिने पालकांना दिली.

हादरल्याने पालकांनी मुलीला सोबत घेत शुक्रवारी रात्री मनोर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 376 आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी हा फिर्यादी मुलीचा नातेवाईक असल्याची माहिती पुढे येत आहे.

गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यापासून आरोपी फरार झाला आहे.आरोपी बांगरचोळे गावालगतच्या जंगलात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती मनोर पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here