रणवीर सिंगने चिकनी चमेलीवर असा केला डान्स की…कतरिना कैफ हसू आवरू शकली नाही…पाहा Video

फोटो- सौजन्य सोशल मिडिया

न्यूज डेस्क – रणवीर सिंग टीव्ही शो ‘द बिग पिक्चर’द्वारे लोकांचे मनोरंजन करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. आगामी एपिसोडमध्ये कतरिना कैफ त्याच्या सूर्यवंशी चित्रपटाचे निर्माता रोहित शेट्टीसोबत प्रमोशन करताना दिसत आहे. चॅनलने शोचे प्रोमो रिलीज केले आहेत.

प्रोमोमध्ये रोहित शेट्टीने रणवीर आणि कतरिना यांच्यात नृत्य स्पर्धा आयोजित केली . दोघेही एकमेकांच्या गाण्यांवर डान्स करताना आणि जबरदस्त स्टेप्स करताना दिसत आहेत. पण रणवीरही ‘चिकनी चमेली’वर आपल्या डान्सने कतरिनालाही मात दिली आहे.

कलर्स टीव्हीने शोचा प्रोमो शेअर केला आहे. व्हिडीओ क्लिपमध्ये रोहित शेट्टी म्हणतो की, “जर दोघे एकत्र आले , तर संपूर्ण भारताला कळेल की कोण उत्तम डान्सर आहे.” यावर रणवीर-कतरिना पहिल्यांदा ‘ततड़-ततड़’ डान्स करताना दिसत आहेत. यानंतर जेव्हा ‘चिकनी चमेली’ गाणे सुरु केल्यावर रणवीर सिंग कतरिनाच्या एक पाऊल पुढे जावून डांस केला. तो गाण्यात हुक स्टेप करतो, ज्यावर खूप शिट्ट्या वाजवल्या जातात. त्याचा डान्स पाहून कतरिनालाही हसू आवरता आले नाही.

पाहा Video

सौजन्य – कलर्स टीव्ही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here