नेहरू युवा केंद्र संघटनांतर्फे जलशक्ती अभियाना अंतर्गत रांगोळी स्पर्धा…

दर्यापूर :- नेहरू युवा केंद्र संघटन खेल मंत्रालय भारत सरकार, अमरावती यांच्याविद्यमानाने दर्यापूर तालुक्यात ” जलशक्ती अभियाना “अंतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन दिनांक 20 मार्च 2021 रोजी करण्यात आले होते. यामध्ये एकूण 11 महिलांनी सहभाग घेतला होता.

रांगोळी स्पर्धा ही ऑनलाइन पद्धतीने आपापल्या दारी काढण्यात आली. रांगोळी स्पर्धेमार्फत जलशक्ति वर वेगवेगळे संदेश देण्यात आले. जिल्हा युवा समन्वयिका स्नेहल बासुतकर यांच्या मार्गदर्शनाने दर्यापूर तालुकाच्या राष्ट्रीय युवा स्वयंसेविका कु. काजल बानोडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- सौ. सीमा दिनेश गोलाईत यांनी पटकविला तर द्वितीय क्रमांक सौ.शुभांगी महेंद्र विल्हेकर व तृतीय क्रमांक कु.राधिका अरुण काळे यांनी पटकाविला . विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र तसेच सहभाग्याना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here