मेकअपची कमाल बघा…रणबीर कपूर महिलेच्या गेटअपमध्ये…व्हिडीओ व्हायरल…

फोटो- सौजन्य सोशल मिडिया

न्यूज डेस्क – रणबीर कपूर गेल्या ३ वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. यापूर्वी रणबीरच्या अनेक चित्रपटांची घोषणा झाली असून त्यापैकी ‘ब्रह्मास्त्र’ची सर्वाधिक चर्चा आहे. करण जोहरच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर एका महिलेच्या गेटअपमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये रणबीर मेकअप रूममध्ये बसला असून संपूर्ण टीम त्याला परफेक्ट लूक देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

हा व्हिडिओ रणबीर कपूरच्या मेकअप आर्टिस्ट प्रीतीशील सिंग डिसूझाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना प्रीतीशीलने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘टीव्हीसीसाठी रणबीर कपूरचे स्त्री पात्रात रूपांतर केले. सोशल मीडियावर या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

रणबीर आलियाशी लग्न करणार…
रणबीर कपूर सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की रणबीर कपूर या वर्षी डिसेंबरमध्ये त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत सात फेरे घेणार आहे. आजकाल दोघेही आपापले काम वेळेवर पूर्ण करण्यात व्यस्त आहेत.

सौजन्य प्रीतीशेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here