अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यु…आमडी गावाजवळील घटना…

रामटेक (ता.प्र.)
राष्ट्रीय महमार्ग नागपुर जबलपुर रोड आमडी गांवाजवळ शुक्रवार च्या दुपारी १ वाजता दरम्यान झालेल्या अपघातात अमर किशोर धुर्वे (२८) याचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत घटनास्थळीच मृत्यु झाला.

प्राप्त माहिती नुसार मृतक अमर धुर्वे ( २८)मोहगांव जिल्हा सिवनी मध्यप्रदेश येथील रहीवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अमर हा डुमरी येथील एका शेतामध्ये मजूरी करत होता. शुक्रवार शुक्रवार च्या दुपारी १ वाजता दरम्यान आपल्या गावला जाण्याच्या उद्देशाने तो बसस्टॉप वर बस वाहानाची वाट पहात होता. नेमके याच वेळी अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की युवकाचा मेंदु बाहेर आला. ज्यामुळे युवकाचा घटनास्थळावरच मृत्यु झाला.

घटनेची माहिती नागरिकांमार्फत पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळावर दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठविला. पुढील तपास एपीआय निशा भुते, विलास केंद्रे, गोपाल डोकरमारे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here