रामटेक | तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या!…

रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )

शहरातील जयप्रकाश वार्ड (मोठी गडपायरी) स्थानिक रामनारायण बोरकर यांच्या चार मुलांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा, पंकज रामनारायण बोरकर (वय-२७ वर्षे) यांनी घरातील पंख्याला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १३ मे रोजी रात्री घडली.

शनिवारी १४ मे रोजी त्याची आई त्याच्या खोलीत गेली असता पंकज पंख्याला दुपट्ट्याने लटकलेला दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, पंकज गेल्या चार वर्षांपासून राज्यसेवा परीक्षेची तयारी करत होता. पण त्याच दरम्यान त्याला आयपीएल क्रिकेटचे व्यसन जडले. हताश होऊन त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेचा तपास ठाणेदार प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल सदाशिव काटे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here