दहा लाखाच्या पुरस्काराने गावकरी आनंदले…
देवलापार – पुरुषोत्तम डडमल
रामटेक तालुक्यातील आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांद्रा ग्रामपंचायतीने मागील वर्षात केलेले विविध कामे व उपक्रमांनी तालुका स्तरावर दिला जाणारा पहिल्या क्रमांकाचा “स्मार्ट ग्राम ” पुरस्काराचा मानकरी ठरल्याने प्रशस्तीपत्र व दहा लाख रुपये प्रदान करण्यात येणार आहे.
त्यामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. आर.आर. (आबा) पाटील यांचे नावावर सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत हा पुरस्कार आबासाहेब खेडकर सभागृह, नागपूर येथे वितरण करण्यात आले.हा पुरस्कार सरपंच रामचंद्र झलीराम अडमाची आणि सचिव मुकुंदा सदाशिव मरर्सकोल्हे यांनी स्वीकारला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी श्यामकुमार बर्वे,उपाध्यक्ष मनोहर कुंभारे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्राचे प्रकल्प संचालक, विवेक ईलमे, उप कार्यकारी अधिकारी, आरोग्य स्वच्छता विभाग,अनिल किटे , जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे, पंचायत समिती रामटेकच्या सभापती कलाताई ठाकरे यांच्या हस्ते सदर पुरस्काराने गौरविण्यात आले.
वृक्षारोपण, पाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायतीचे सुशोभिकरण, परसबाग, रोपवाटिका, स्वच्छ सुंदर शाळा, नवीन अंगणवाडी इमारत, बांधकामे, वाचनालय, संगणकीकृत, सौर पथदीवे, सार्वजनिक इमारत, रंगरंगोटी, सजावट , माता बाल संगोपन केंद्र दुरुस्ती, ग्रामस्त सजावट, गाव स्वच्छता इत्यादी.
अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम सरपंच रामचंद्र अडमाची यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेे.सरपंच अडमाची यांना या कालावधीत गावकऱ्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व अधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले असे सरपंच रामचंद्र अडमाची यांनी सांगितले.