Wednesday, February 21, 2024
Homeराज्यरामटेक | पेंच व्याघ्र प्रकल्पात होणार गजराजाचे दर्शन...

रामटेक | पेंच व्याघ्र प्रकल्पात होणार गजराजाचे दर्शन…

Share

  • पेंच व्याघ्र प्रकल्प पर्यटनाच्या शिरपेचात मानाचा तुरा
  • पर्यटकांसाठी गोड बातमी

रामटेक – राजु कापसे

रामटेक:- पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना हमखास व्याघ्र दर्शन होतच असते. आता यापुढे येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना गजराजाचे दर्शनाचाही लाभ होणार आहे. दि.२८ नोव्हेंबर २०२३ ला कर्नाटक वन विभागा तून दोन हत्ती पेंच व्याघ्र प्रकल्प येथिल चोरबाहूली (वन्यजीव) परिक्षेञात आणण्यात आले आहेत.

भिमा व सुब्रमणयम या नावाचे दोन हत्ती येथे पोहचले असून अजून दोन हत्ती आणले जाणार आहेत. भिमा हत्ती हा मोत्तीगुड (कर्नाटक) येथील असून तो ५३ वर्षांचा आहे तर सुब्रमणयम हत्ती हारंगी (कर्नाटक) येथील असून तो २५ वर्षांचा आहे. २८ नोव्हेंबर ला सकाळी १० वा. रामटेक चे आमदार आशिष जयस्वाल, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ.प्रभुनाथ शुक्ल यांच्या हस्ते दोन्ही हत्तींचे विधिवत पुजन करुन पेंच व्याघ्र प्रकल्पात स्वागत करण्यात आले.

यावेळी सहा.वनसंरक्षक पेंच प्रकल्प,नागपूर वाय.बी.नागुलवार, गोरेवाडा प्रकल्प, नागपूर चे डॉ.सुजित कोलंगत, वनपरिक्षेञ अधिकारी (वन्यजीव) चोरबाहुली चे श्री.राहुल शिंदे यांच्यासह वनपरिक्षेञ चोरबाहुली येथिल संपूर्ण वन कर्मचारी यावेळी उपस्थित होते. हत्तींच्या आगमनाने पेंचच्या पर्यटनात अधिक भर पडेल असे मत आमदार जयस्वाल यांनी यावेळी व्यक्त केले.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: