रामटेक | जीवघेण्या रस्त्याच्या विरोधात दही भात शांती आंदोलन…

रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )

रामटेक जवळील वाहीटोला ते अंबाळा पर्यंतचा रस्ता अनेक उणीवपूर्ण पद्धतिने तयार करण्यात आल्याने हल्ली नेहमी येथे अपघात होत असून मागील ३० दिवसात तब्बल ६ लोकांचा जीव येथे गेलेला आहे. तेव्हा अनेकांना दवाखान्याचे तोंड पाहण्यास भाग पाडणाऱ्या या रस्त्याच्या त्रुटी काढुन दुरुस्ती करण्यासाठी शासन प्रशासनाला जागृत करण्यासाठी आज ११ मे ला वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष राहुल कोठेकर यांच्या नेतृत्वात आज बसस्थानक चौक रामटेक येथे दही भात शिंपून रस्त्याची शांती करण्याचे आंदोलन करण्यात आले.

वाहीटोला ते अंबाळा वळन पर्यंतचा जीवघेण्या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करून लोकांच्या जिवाला निर्माण होणारा धोका दूर करण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले असल्याचे राहुल कोठेकर व अजय मेहरकुळे यांनी माहिती देतांना सांगीतले. याबाबद स्थानिक एस.डी.ओं. ना एक निवेदन देण्यात आले असुन त्यामध्ये वाहीटोला रेल्वे क्रॉसिंग जवळील रोड तयार करणे, रोडच्या बाजूला सर्विस रोड तयार झालेला असून त्या रस्त्याचे मुख्य रस्यामध्ये रूपांतर करून त्याच्या मध्यभागी डिव्हायडर तयार करणे, स्ट्रीटलाइट त्वरित चालू करने, लंबे हनुमान मंदिर जवळील वळणाची दुरुस्ती अशा अनेक मागण्या निवेदनामध्ये व आंदोलनादरम्यान ठेवण्यात आलेल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here