रामटेक ला विविध ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा…

रामटेक – राजू कापसे

रामटेक तालुक्यातील शितलवाडी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या वैशाली नगर येथे वैशाली  बौध्द विहार समिती कडुन धम्मचक्र प्रवर्तन दिवस झेंडा वंदन व सामुहीक बुध्द वंदना घेवुन साजरा करण्यात आला.

तसेच रामटेक शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला माल्यार्पन करुन बूध्द वंदना घेण्यात आली तसेच बुंदी आणि पेढे वाटव करुण धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने परिवर्तन मंच समितीचे अध्यक्ष राहुल जोहरे, मंगेश भोजने, कृृृपासागर भोवते,मनोहर धमगाये,ओमकार खोब्रागडे,चंद्रशेखर सांगोडे,गायकवाड सर,वेनुदास भिमटे ,हंसराज नाईक,जिभे, सुरेश बोरकर,दिनेश मुन,उत्तम मुन,दिपराज भोवते,ढोके सर, सौ.मालती भोवते,भारती गजभिये,सरला नाईक,कल्पना जोहरे,अल्का मेश्राम,सुमित्राताई सांगोडे,माधुरी मेश्राम आदी उपासक व उपासीका उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here