जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी रामोशी, बेरड, बेडर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…

सांगली – ज्योती मोरे

महाराष्ट्रातील रामोशी, बेरड,बेडर समाज समाज क्रांतीकारी समाज आहे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांती के पहिले बंड केले व ब्रिटिशांना सळो कि पळो करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख शुरवीर बहीर्जी नाईक यांचे स्वराज्य स्थापना करण्यासाठी मोलाचे योगदान आहे.

आजही महाराष्ट्रातील क्रांतिकारी रामोशी, बेरड, बेडर समाज, भटके विमुक्त, शोषित, वंचित, घटक व इतर मागास वर्गीय समाज हा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक दृष्ट्या शासनाच्या विकासात्मक, कल्याणकारी योजना पासून कोसो दूर आहे. यामुळे रामोशी बेरड बेडर समाज व ओबीसी यांच्या न्याय हक्कासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळालेच पाहीजे

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींना 27% आरक्षण राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे.

भटके-विमुक्त समुदायाला पदोन्नती मधील आरक्षण मिळाले पाहिजे.

१) रामोशी, बेरड समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा.
२) जातीच्या दाखल्या बाबतच्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात.
३) जातीचा दाखला व इतर नागरिकत्व पुरावे देण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात यावे.
४) शासकीय-निमशासकीय जागेवरील राहती घरे व वहीवाटी खालील क्षेत्र नियमितीकरण करण्यात यावे.
५) भूमिहीन, बेघर यांना राहण्यासाठी पक्की घरे मिळावी.
६) मच्छिमार सोसायटी मध्ये रामोशी समाजाला सभासद करून घ्यावे.
७) रामोशी समाजाला मच्छीमारी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मच्छीमारी व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी.
८) हाताला काम राहायला घर मिळाले पाहिजे.
९) लघु-मध्यम उद्योगाला थेट सुलभ अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे.
१०) मूळ विमुक्त भटक्या जमातींना लावण्यात आलेली क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करण्यात यावी.
१२) रामोशी समाजासाठी फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या शंभर कोटीचा निधी तात्काळ मिळाला पाहिजे.
१३) धनदांडग्यांनी बळकावलेल्या व शासनाच्या ताब्यात असलेल्या इनाम वर्ग अ, ब च्या वतीनी जमिनी रामोशी समाजाला बिनशर्त परत मिळाल्या पाहीजेत.
१४) बानुरगड येथील बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाला भरीव निधी मिळाला पाहिजे.
१५) बहिर्जी नाईक यांचे बानूरगड येथे राष्ट्रीय स्मारक उभे करण्यात यावे.
१६) गुहागर – विजापूर या मार्गाला बहिर्जी नाईक यांचे नाव देण्यात यावे.
१७) भटके विमुक्त जमातींची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी.
१८) रामोशी समाजावर गुन्हेगारीचा कलंक व भेदभाव नष्ट झाला पाहिजे.
१९) सवयीचा गुन्हेगार जमाती कायदा रद्द झाला पाहिजे.
२०) NEET ची परीक्षा तामीळनाडू सरकारच्या धरतीवर रद्द झाली पाहीजे.
२१) भटके-विमुक्त जमातींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे.
या मागण्यांसाठी सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here