रामकृष्ण बाबा पाटील यांच्या निधनाने अनुभवी व निष्ठावान नेतृत्व गमावले !…बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. २ सप्टेंबर २०२०
औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक अनुभवी व निष्ठावान नेतृत्व गमावले आहे. अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

रामकृष्ण बाबा पाटील यांनी सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष, राज्य सहकारी बँकेचे संचालक, आमदार, खासदार अशी विविध पदे त्यांनी भूषवली. मिळालेल्या पदांचा वापर त्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी केला.

समाजकारणासोबतच शेती, सहकार आणि अध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.
रामकृष्ण बाबा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे थोरात म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here