रक्षा विसर्जन विधी केला शेतात, निसर्गाला जपत उचलले पाउल…

दानापुर – गोपाल विरघट

मृत्यु हा पाण्याचा बुडबुडा आहे तो केव्हा येईल कधी येईल कुठ येईल सांगता येत नाही, मृत्यु अंतिम सत्य असते परंतु मळलेल्या वाटेनं न जाता प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचे धाडस दानापुर येथील विरघट परिवाराने दाखवून पर्यावरण जपन्याचा पायंडा पाडला आहे.

दानापुर येथील महादेव विरघट हे शेतात काम करित असताना वयाच्या 67 व्या वर्षी ह्रदविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांचा मुलगा राहुल विरघट,
विनोद विरघट, (राज्यकर अधिकारी )जावाई अरुण सिरसाट, अनिल डोंगरे, जीवन डोंगरे, व अमोल पहुरकार यांनी रक्षेचे विसर्जन शेतात केले, व त्या जागेवर झाड लाविले.

पिढयानपिढया पासून चालत आलेल्या प्रथा – परंपरा – रिति -रिवाज मोडण्याचे धाडस कोनी करत नाही विशेषता: मरण प्रसंगी लोक भाऊक होतात आपण करत असलेली कृति योग्य की अयोग्य याचा विचार न करता प्रथेनुसार चालत आलेले कर्मकांड करण्याकडेच बहुतेकांचा कल असतो.

सर्वधारणपणे अस्थि व रक्षेचे विसर्जन नदित केले जाते, त्यामुळे जलप्रदूषण होऊन जीवसृष्टी धोक्यात येते.असे होऊ नये व समाजात हा संदेश जावा या हेतूने विरघट परिवाराने हा पर्यावरण पुरक धाडसी निर्णय घेतला.

1 COMMENT

  1. अत्यंत सटिक वर्णन केलेली बातमी आहे काळा ची गरजअधोरेखित करतं या बातमीने समाज जागृती करण्यासाठी आपण सर्वांच्या आयुष्यात येत बदलाचे संकेत यातून पूढे नेणारी ही बातमी प्रसिद्ध झाली आहे! खूप खूप छान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here