Video Viral | राखी सावंतने लस घेतांना केली ही फर्माईश…

न्यूज डेस्क : बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. काही दिवसांपूर्वी राखी Reality Show बिग बॉस १४ मध्ये दिसली होती. तिने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते. राखी सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी ती भाजी घेताना दिसते तर कधी कॉफी. पण राखीचे वागणे पाहून सर्वांना हसू येते. आता राखीचा करोना लस घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या ड्रामा क्वीनने स्वत: इन्स्टाग्राम अकाऊंटवर लस घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. लस घेताना राखी घाबरली असल्याचे दिसत आहे. दरम्याम ती ‘मी एक गाणे गाऊ का?’ असे बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये राखी सांगते की, ‘तेरे ड्रीम में मेरी एण्ट्री’ हे तिचे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

राखीने व्हिडीओ शेअर करत ‘मी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता तुम्ही माझ्या आगामी व्हिडीओची वाट पाहा’ असे कॅप्शन दिले आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे. विंदु दारा सिंह यांनी राखीच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. एका यूजरने कमेंट करत ‘तू प्रत्येक परिस्थितीमध्ये कमाल करतेस’ असे म्हटले आहे.

राखी सावंत ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती अनेक ठिकाणी फिरताना दिसते. तिचे मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राखी स्वत: देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here