सांगली प्रतिनिधी ज्योती मोरे
राज ठाकरे यांनी आयोध्या ला जावं तो त्यांचा अधिकार आहे पण अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगली येथे व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी भगवा रंग परिधान केलाय त्यामुळे त्यांनी शांतीच्या दिशेने आपली वाटचाल करावी दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करू नये आम्ही महाराष्ट्र पेटु अशा धमक्यांना महाराष्ट्र घाबरत नाही महाराष्ट्रातील जनता ही शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची जनता आहे असा टोलाही आठवले यांनी यावेळी लगावला.
दरम्यान भाजपने या भुंगा प्रकरणात राज ठाकरे यांना पाठिंबा दिलेला नाही त्यांच्या सारख्या वादग्रस्त हिंदुत्वाला सोबत घेऊन भाजपचा फायदा नाही आणि रिपब्लिकन पक्ष सोबत असताना त्याची काही आवश्यकता नाही नाही अशी जोरदार ठीक आहे मंत्री आठवले यांनी यावेळी केली आहे.