रामटेक – राजू कापसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांनी पुर्व विदर्भातील पक्षाच्या आढावा बैठकीत नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुका अध्यक्ष – श्री. शेखर दुंडे यांचे कार्य अहवाल पुस्तिकेचे विमोचन करीत रामटेक विधानसभा व लोकसभा क्षेत्राचा आढावा घेतला.
सदर प्रसंगी तालुका अध्यक्ष श्री. शेखर दुंडे यांचे कार्य अहवाल पुस्तिकेचे वाचन करित मा. राजसाहेब ठाकरे यांनी श्री. शेखर दुंडे यांना नागपुर जिल्ह्याचे अध्यक्ष पदावर नियुक्ती देण्याचे आश्वासन देत, जोमाने पक्ष बांधणीसह येणाऱ्या निवडणूकीत जास्तीतजास्त उमेदवार निवडूण याणण्याचे आदेशवजा सुचना देत श्री.शेखर दुंडे यांचे केलेल्या कामाचे कौतुक करीत पाठ थोपवित आशिर्वाद दिले.