भारतीयांचा कमाल…गुगल ट्रेंडवर सर्वाधिक Porn सर्च मध्ये राज कुंद्रा…आणि

न्यूज डेस्क – अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक केल्यानंतर सोशल मिडीयावर नेटकर्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून Twitter वर तर बरेच ट्रेंड सुरु होते, तर दुसरीकडे गुगल सर्चिंग वर चक्क राज कुंद्रा Porn सर्च ट्रेंडीग होते. सोमवारपासून भारतीयांनी देशातील करोना संकटापेक्षा पॉर्न आणि राज कुंद्रा यांच्याबद्दल सर्वाधिक सर्च केलं आहे.

सध्या कुंद्रा हे भायखळ्यातील तुरुंगामध्ये आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे भारतातील पॉर्न चित्रपट आणि त्यांच्यावरील बंदी, कायदे, नियम याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत.

अनेकांनी मिम्स बनवून राज कुंद्रा यांना आपल्या चित्रपटांच्या link पाठवा अशीही मागणी केली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉलिवूडमधील व्यक्ती पॉर्नसारख्या उद्योगांमध्ये सहभागी असल्यावरुन टीकेची झोड उठवलीय. मात्र असं असतानाच गुगलच्या डेटामध्ये भारतीय हे पॉर्न सर्च करण्यामध्येही आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.

सौजन्य – गुगल

गुगल ड्रेण्डवर १४ जुलै ते २१ जुलैदरम्यानचा म्हणजेच आठवड्याभराचा डेटा पाहिल्यास लक्षात येतं की भारतामधील लोक हे करोनापेक्षाही पॉर्नसंदर्भात अधिक प्रमाणात गुगल सर्च करतात. राज कुंद्रा यांना १९ जुलै रोजी अटक करण्यात आली. मात्र त्या दिवशी त्यांच्यासंदर्भातील सर्च वाढल्याचं गुगलच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मात्र १९ तारखेच्याआधीपासूनच म्हणजेच १४ जुलैपासून पॉर्नसंदर्भातील सर्च हा करोनाव्हायरस संदर्भातील सर्चपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी पॉर्नसंदर्भातील सर्चचे प्रमाण वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

पॉर्नसंदर्भातील सर्चमध्ये रिलेटेड टर्म म्हणजेच पॉर्न हा विषय कशाच्या संदर्भाने सर्च झाला यामध्ये मागील सात दिवसांमध्ये राज कुंद्रा यांच्याच नावाच समावेश आहे. ‘राज कुंद्रा पॉर्न’, ‘राज कुंद्रा पॉर्न व्हिडीओ’, ‘राज कुंद्रा पॉर्न व्हिडीओज’, ‘राजकुंद्रा पॉर्न’, ‘राज कुंद्रा पॉर्न मुव्हीज’ हे सर्च मागील काही दिवसांपासून पॉर्नसंदर्भातील सर्चमध्ये अव्वल आहेत. त्यामुळेच एकीकडे राज कुंद्रावर टीका होत असतानाच दुसरीकडे गुगलच्या डेटामध्ये मात्र त्यांच्या अटकेचासंदर्भ असणाऱ्या पॉर्नबद्दल आणि त्यांनी बनवलेल्या चित्रपटांबद्दल सर्च होण्याचं प्रमाण वाढल्याचं विरोधाभास दिसणारं चित्र स्पष्ट होत आहे.

११ व्या क्रमांकावर पंजाब, १२ व्या क्रमांकावर त्रिपुरा, १३ व्यावर पश्चिम बंगाल, १४ व्या स्थानी आंदमान निकोबार, १५ व्या स्थानी गुजरातचा समावेश आहे. उत्तर प्रदेश (१६), उत्तराखंड (१७), राजस्थान (१८), बिहार (१९), छत्तीसगड (२०) या राज्यांचा अव्वल २० मध्ये समावेश आहे. झारखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली, ओडिशा ही पुढील पाच राज्य आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्र २६ व्या स्थानी आहे. महाराष्ट्राखालोखाल गोवा, दादरा नगर हवेली, केरळ आणि दिव दमण यांचाही अव्वल ३० मध्ये समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here