गावपातळीवर कोविड भयमुक्तीसाठी जनजागृती करा…ठाणेदारांचे पोलिस पाटीलांना आवाहन…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

कोविड-19 चा तालुक्यात दिवसेंदिवस वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता समाजात या आजाराविषयी निर्माण झालेली भिती दूर सारन्यासाठी शासन निर्देशाचे पालनात जनजागृती करा असे आवाहन लाखांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम यांनी केले आहे.सदर आवाहन गत 10ऑक्टो.रोजी दुपारी 12वाजता लाखांदूर पोलिस ठाण्यात आयोजित पोलिस पाटील बैठकीत केले आहे.

ते पुढे म्हणाले,तालुक्यात कोरोना विषाणू बाधित रुग्ण संख्येत नियमित वाढ होतांना काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे.सदर आजाराच्या नियंत्रनासाठी शासन स्तरावर सर्वच उपाययोजना केल्या जात असतांना समाजातील प्रत्येक घटकाचा स्वयंस्फूर्त सकारात्मक प्रतिसाद आवश्यक असल्याचे म्हटले.

येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे.मात्र कोरोना परिस्थिती लक्षात घेता शासन निर्देशानुसार हा उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे सांगितले.या उत्सवादरम्यान तालुक्यात कोठेही शासन नियमांचे उल्लंघन होणार नाही यासाठी गावपातळीवर आवश्यक जनजागृती करण्याचे देखील सांगितले.

दरम्यान नागरिकामधील कोरोना आजारा विषयी निर्माण झालेली भिती दूर सारन्यासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करुन कोविड चाचणीसाठी स्वयंस्फूर्त समाज निर्मितीसाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले.या बैठकीला तालुक्यातील सर्वच गावातील बहुसंख्य पोलिस पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here