कोकणात पावसाचा कहर…रायगडमध्ये दरड कोसळून चार जणांचा मृत्यू…

न्यूज डेस्क – काल पासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर कोकणातील रायगड, चिपळून, महाड आदी ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेकडो नागरिक पूरात अडकलेले आहेत. तर, कित्येक भागांमध्ये दरडी कोसळल्याने मार्ग देखील बंद झालेले आहेत.

पूरात अडकेलेले नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत असून, प्रशासनाकडून त्यांच्या सुटकेसाठी युद्धपताळीवर प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुटकेसाठी रायगडमधील  महाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. तर,पोलादपूर सुतारवाडी परिसरात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रूमकडून  देण्यात आली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातल्याने पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कित्येक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, गावांना पूराने वेढा दिल्याने नागरिक अडकले आहेत. या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय नौदलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये नेव्हीची पथक दाखल झाली असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून नौदलाकडे मदतीची मागणी करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here