अमरावती जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी वरुड भागात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे.
तर गुंजी परिसरात हलक्या स्वरूपाची गारपीट सुद्धा झाली आहे. सद्याची परिस्थिती बघता ढगाळ वातावरणामुळे पुन्हा पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.