Rain Update | मुंबईत पावसाचे जोरदार आगमन…विदर्भातही पावसाची शक्यता…

न्यूज डेस्क – केरळहून मुंबईत दाखल झालेला मान्सून आता अधिक वेगाने पुढे सरकत आहे. बुधवारी जोरदार पावसासह मुंबईत मान्सून दाखल झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत मान्सूनचे आगमन झाले आहे. रात्रीपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. अद्यापही अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु होती मात्र आता पावसाचा जोर वाढला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याच देखील सुरुवात झाली आहे.

आज मानसुन मुंबई सह महाराष्ट्राच्या बरेच भागात पोहचण्याची.शक्यता आहे. दिनांक ११ तारखेला उत्तर बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात १० तारखेपासून पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. १२ जुन रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच या वादळाच्या मुळे विदर्भात १४ तारखेच्या आसपास मानसुनचे आगमन तेलंगणा मार्गे होण्याची शक्यता आहे.

९,१०,११ जुन या दरम्यान विदर्भात बरेच ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोबतच १२,१३ जुन विदर्भात सार्वत्रिक पाऊस काही ठिकाणी मुसळधार। पुर्व विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त राहील. १४ ते १६ मध्य भारतात चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे प्रा अनिल बंड यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here