साटक शिवारातील मोहफुल दारुभट्टीवर धाड, ४५० लिटर गावठी दारूसह ४०० लिटर सडवा जप्त…

एकुण १ लक्ष ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त…
रामटेक पोलिसांची मोठी कारवाई…

रामटेक – राजु कापसे

रामटेक पो. स्टे. अंतर्गत येणाऱ्या साटक शिवारात गॅस भट्टीवर मोठ्या प्रमाणात मोहफुल दारू गाळत असल्याची माहिती रामटेक पोलिसांना मुखबिर द्वारे मिळताच पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पि.एस.आय. प्रमोद राऊत, पो. हवालदार निलेश बिजवाड, पो.ना. नितेश पिपरोदे, योगेश भुरे, प्रज्वल नंदेश्वर यांनी सदर ठिकाणी धाड टाकली असता १ लक्ष ६४ हजारांचा अवैध गावठी दारु साठा जप्त करण्यात आलेला असुन आरोपींना अटक करून विविध गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, आज दि. २० एप्रील ला एका मुखबिर द्वारे साटक शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारू काढत असल्याची माहिती रामटेक पोलिसांना मिळताच लगेच ही माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांना कळविण्यात आली व त्यांचे मार्गदर्शनानुसार एका खासगी वाहनातर्फे साटक शिवारातील सदर ठिकाणी धाड टाकली असता तेथे यावेळी आरोपी रामा कुंभलकर हा आपल्या दोन साथीदारांसह लोखंडी गॅस शेगडीवर ३ ड्रम दारु काढतांना आढळुन आला.

यावेळी त्याच्या ताब्यातुन ४३० लिटर मोहफुल गावठी दारूसह ४०० लिटर मोहफुल सडवा व भट्टीला लागणारे इतर साहित्य असे मिळून १ लक्ष ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन यापुर्वीही त्याच्यावर दोन – तिन गुन्हे दाखल असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी सांगीतली.

दरम्यान आरोपींना अटक करून पो.स्टे. ला आणुन त्यांचेवर कलम ६५ क.ब.ई. फ. कलम ८३ म.दा.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आरोपींना सुचनापत्रावर सोडण्यात आले. पुढील तपास डि.वाय.एस.पी. नयन आलुरकर व पोलीस निरीक्षक प्रमोद माकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार निलेश बिजवाड करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here