राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले…

न्युज डेस्क – कॉंग्रेस नेते राहुल गांधी तीन कृषी कायद्याविरुध्द आणि शेतकऱ्याच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर चालवून संसदेत पोहोचले. या दरम्यान ते म्हणाले की, केंद्र सरकारला नवीन कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. त्याचबरोबर सीआरपीसीच्या कलम 144 चे उल्लंघन करून ट्रॅक्टर मार्च काढल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी कॉंग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला, युवा कॉंग्रेस प्रमुख श्रीनिवास बिवी आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

केंद्र सरकारवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, हे कायदे 2-3 मोठ्या उद्योगपतींच्या बाजूने आहेत हे संपूर्ण देशाला ठाऊक आहे. हे शेतकर्‍यांच्या हितासाठी नाहीत. हे अंधकारमय कायदे आहेत. सरकार शेतकऱ्याचा आवाज दाबून संसदेत चर्चा होऊ देत नाही. मी शेतकऱ्याचा संदेश संसदेत पोहोचविला आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की सरकार असे मानते की शेतकरी खूप खूश आहेत आणि बाहेर बसलेले (निषेध करणारे शेतकरी) अतिरेकी आहेत. पण प्रत्यक्षात शेतकर्‍यांचे हक्क चोरले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here