अमरावती शहरात धुलीवंदनाच्या दिवशी राडा…सहा जणांनी मिळून युवकाला केली बेदम मारहाण…घटना CCTV मध्ये कैद…

मयुरी मिठ्ठानी – अमरावती शहरातील नवसारी जवळील यश बार जवळ काल सायंकाळी धुलीवंदनाच्या दिवशी सहा जणांनी एका 21 वर्षीय युवकाला काठीच्या साहाय्याने बेदम मारहाण केली,यात युवक मृत्यूशी झुंज देत असून सार्वजनिक ठिकाणी घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे,

यातील जखमी व मारेकरी दोन्ही गुंडगिरी प्रवृत्तीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, एका जुन्या वादातून धुलीवंदनाच्या दिवशी हा राडा झाला, भूषण पोहोकार वय 21असे जखमी युवकाचे नाव असून तो रस्त्याने जात असतांना जुना वचपा काढण्यासाठी 6 युवक दबा धरून बसले होते त्यांनी युवकावर पकडून लाठी बुक्कीने जबर मारहाण केली यात त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे..

हे पण वाचा – दर्यापूर ते अमरावती मार्गावरील लखापुर फाट्यावर टू व्हीलर भीषण अपघात एक ठार एक गंभीर जखमी…

तर गाडगेनगर पोलीसांनी 5 जणांना अटक केली असून यातील एक जण पसार झाला आहे तर यातील 4 युवक अल्पवयीन आहे, या घटनेनंतर अमरावती जिल्हात खळबळ उडाली असून मारहाणीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here