पातूर सम्राट धाब्यावर राडा १ जखमी…

पातूर – निशांत गवई

पातूर वाशीम मार्गा वरील सम्राट धाब्यावर दोन गटात शाब्दिक बाचाबाची होऊन एक जण गंभीर झाल्याचि घटना आज सायंकाळी 6:30 वाजता चे दरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि सम्राट धाब्यावर रिसोड येथील चार इसमानी येच्छेद दारू प्राशन केली असता बाजू च्या टेबल वरील दोन जणा सोबत साब्दिक वाद झाला या वादाचे पर्यावंसन मारहाणीत होऊन पातूर येथील एका च्या डोक्यात बियर च्या शिश्या फोडून त्याला जखमी केले.

रिसोड येथील या मद्यपि एवढ्यावरन थांबता धावत जाऊन गाडी मधील तलवार घेऊन सम्राट धाब्यावर अक्षरशः धुमाकूळ घालणे सुरु करण्यास सुरु केले सदर हैदोस बघून धाब्यावरील नागरिकांनि तेथून धूम ठोकली काही सुज्ञ नागरिकांनि याबाबत पोलिसांना कळविले असता पातूर पोलीस ठाण्याचि गाडी पोहचे पर्यंत रिसोड येथील मद्यपि त्यांनी आणलेल्या स्विफ्ट डिजायर गाडी ने वाशीम कडे पळवली असून वृत्त लिहेस्तोवर पातूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

वाशीम मार्गांवर असलेल्या सम्राट धाब्यावर शासनाने दिलेल्या नियमाचि ऐसीतैसी होत असल्याचे चित्र मागील अनेक दिवसा पासून पाहायला मिळत असून या धाब्यावर अधिकारी कारवाई करत नसल्याने ढाबा मालकाचि हिम्मत वाढली असल्या चि चर्चा नागरिकांमध्ये ऐकन्यास मिळाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here