ग्रा.पं.खैरी बिजेवाडा ला आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार…

रामटेक – राजू कापसे

रामटेक – मनसर मार्गावरील तथा स्थानीक पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रा.पं. खैरी बिजेवाडा ला नुकताच आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रा.पं. खैरी बिजेवाडा च्या सरपंचा सौ. उर्मिला जगदीश खुडसाव यांचेसह ग्रा.पं. सदस्य, ग्रामविकास अधिकारी तथा येथे कार्यरत कर्मचारी यांच्या अविरत व अथक प्रयत्नांचे आज फलीत म्हणुन हा पुरस्कार मिळाल्याचे मत यावेळी सरपंच सौ. उर्मिला खुडसाव यांनी माहीती देतांना सांगीतले.

दि. १६ फेब्रु. ला जि.प. इमारत भवनात सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान सरपंच सौ. जगदीश खुडसाव यांना वटवृक्ष व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सन २०२० – २१ अंतर्गत पार पडलेल्या स्पर्धेत तालुका स्तरावर सर्वाधिक गुण मिळाल्याने सदर पुरस्कार ग्रा.पं. खैरी बिजेवाडा ला प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थितांमध्ये पालकमंत्री नितीन राऊत, जि.प. अध्यक्षा रश्मीताई बर्वे, मुख्यकार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, जि.प. सदस्य दुधराम सव्वालाखे यांचेसह इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here