दलितांवरील वाढते अत्याचार वाढती महागाई आणि विविध आरक्षणाबाबत आर.पी. आय. आठवले गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…

सांगली – ज्योती मोरे

राज्यात वाढत असलेले दलितांवरील अत्याचार,ते करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, पेट्रोल-डिझेल याबरोबरच अन्नधान्यांच्या किमती वरील कर कमी करण्यात यावेत, राज्यातील भूमीहीनांना पाच एकर शेती मिळावी, सरकारी नोकरी मधील मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्यात यावा, मराठी समाजातील आर्थिक दुर्बलांना आरक्षण मिळावं ,स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण लागू करण्यात यावे,

आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात योग्य म्हणने मांडू न शकलेल्या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर प्रदेश सचिव विवेक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जगन्नाथ ठोकळे, सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण आठवले, महिला आघाडी अध्यक्ष छायाताई सर्वदे,विधानसभा अध्यक्ष बापूसाहेब सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष वाघमारे, सांगली शहराध्यक्ष माणिक गस्ते,महिला आघाडी सांगली शहराध्यक्ष आशा साबळे, शिवाजी वाघमारे, मनोहर मागाडे,दिनेश साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here