होळकरशाहीच्या पारंपारिक पद्दतीने मान देवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे “विजयादशमी दसरा” संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

माळवाधिपती इंदौर नरेश सुभेदार मल्हारराव होळकर यांनी सुरु केलेली विजयादशमी परंपरा आजही मध्यप्रदेश येथे सुरु आहे. शत्रपुजन, संस्थानमधून मिरवणूक आणि “होळकरशाहीस साजेसा मान” देण्याची प्रथा आहे.सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम पुर्णत्वास आले आहे. स्मारक येथे “स्मारक समिती वतीने होळकरशाही विजयादशमी उत्सवाचे नियोजन केले.”

यावेळी समिती वतीने होळकरशाहीच्या रितीरिवाजानूसार श्री बिरोबा चरणी मान पोच करण्यासाठी बिरोबा भक्त, मुरसिद्ध वालुग प्रमुख, गजी ढोल प्रकार सातासमुद्रापार प्रसिद्धिस आणुन सोळा देशांमध्ये ढोलवादन व गजीढोल माध्यमातून परंपरा पोचविणारे, विविध पुरस्कार पात्र, कलेच्या क्षेत्रात डॉक्टर पदवी मिळिवलेल्या मा. बाळासाहेब मंगसुळे यांना इंजि. शिवाजी शेंडगे साहेब यांचेकडून प्रदान करणेत आला.

कार्यक्रमाची सुरुवात होळकरी बांड निशाणाचे अनावरण आणि पुजन/औक्षण निवृत्त अधिकारी तानाजी जेंगटे साहेब यांचे हस्ते झाले. होळकरशाही विजयादशमी महोत्सव व परंपरा याबाबत निवांत कोळेकर यांनी माहिती विषद केली. त्यानंतर उपस्थितांत सर्वांना स्मारक समिती वतीने “मान” म्हणून भेट देणेत आली.

कॉम्रेड शशिकांत गायकवाड, निवृत्त इंजि. शिवाजी शेंडगे, नि. प्राचार्य गौतम शिंगे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या फोटोप्रतिमांना पुष्पहार अर्पन करुन वंदन केले. मा. गौतम शिंगे सर यांनी बहुजनांपुढील आव्हाने याविषयी, मा. शिवाजी शेंडगे साहेब यांनी ओबीसी संघटन आणि ओबीसी जनगणना याविषयी तर नगरसेवक मा. विष्णू माने साहेब यांनी आजची सामाजिक राजकीय स्थिती व सामाजिक नेतृत्वांचा पुढाकार याविषयी मनोगत व्यक्त केले.

शमी वृक्षाचे पानांचे प्रतिकात्मक सोने देवघेव करुन एकमेकांना शुभेच्छा देवून कार्यक्रम संपन्न झाला.ह्यावर्षी या “होळकरशाही विजयादशमी महोत्सवाचे पहिले वर्ष.” यापुढे प्रत्येक वर्षी होळकरशाही विजयादशमी दसर्‍याच्या महोत्सवाचे भव्य नियोजन करण्याचे ठरले.यावेळी सर्वश्री इंजि. सुरेश पांढरे साहेब,आनंत बनसोडे साहेब, हरीभाऊ सरगर साहेब, हरिदास लेंगरे साहेब, बाळासाहेब माने, सुमंत भाले साहेब,

शिवाजी वाघमारे सर, डॉ. रामदास हजारे साहेब, कार्पोरेट ट्रेनर बिरु कोळेकर, डॉ. सुरेश वाघ साहेब, प्रा. अजित खरात सर, प्रा. उत्तम हराळे सर,डॉ. रावसाहेब रुपनुर, इंजि. उद्योगपती अनिल कोळेकर , राजेंद्र थोरात साहेब,मुर्तिकार गजानन सलगर, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत व्हणमाने, सुत्रसंचलन निवांत कोळेकर, तर आभार कृष्णा हुलवान यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here