किसान मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक…
यवतमाळ – सचिन येवले
संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकेत यांची सभा आझाद मैदानावर आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे. तरी देखील पंजाबच्या आंदोलक शेतकऱ्यांनी यवतमाळ शहरात धडक दिली. मोदी शाहीनही चलेगी, तानाशाही नही चलेगी, जय जवान जय किसान ,अशी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.