सोशल डिस्टनसिंग नियमांचे उल्लंघनामुळे डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्या कडून दंडात्मक कारवाई…

भरत जगताप,पालघर

डहाणू – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आता केंद्र व राज्य सरकारांकडून हळूहळू शिथिल केला जात आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा धोका अधिक वाढला आहे. त्यासाठी सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन अतिमहत्त्वाचे आहेत.

यासाठी सरकार, जिल्हा प्रशासन, नगरपालिका, ग्रामपंचायत इत्यादी ही लोकांना वारंवार आवाहन करीत आहे. डहाणू शहरात ही मुख्याधिकारी अतुल पिंपळे स्वतः लक्ष देत आहे व सोशल डिस्टंसिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई ही करत आहे, अशीच एक कारवाई आज त्यांच्या कडून केल्याची माहिती मिळाली आहे.सविस्तर बाब अशी की डहाणू नगरपरिषद हद्दीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान सर्व दुकाने (औषध विक्रेता वगळता) उघडं ठेवण्याचे आदेश आहे.

औषध विक्रेता संध्याकाळी ५ नंतर ही उघडे राहतात कारण त्यांना वेळेची मर्यादा नाही, याचा गैरफायदा घेऊन काही औषध विक्रेता सर्वसाधारण वस्तू ही विकत होते. सायंकाळी ५ नंतर डहाणू शहरात एक ही जनरल स्टोर किंवा किराणा दुकान उघडं नसल्याने औषधांबरोबर सर्वसाधारण वस्तूची विक्री करणाऱ्या काही औषध विक्रेत्यांकडे प्रचंड गर्दी होत असून सदर औषध विक्रेत्यांकडून सोशल डिस्टंसिंग नियमांचे भान ठेवत नसल्याचे डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्या निदर्शनास आले.

दैनंदिन शहरात लाऊडस्पीकर द्वारे सोशल डिस्टंसिंग बद्दल जाहीर आव्हान होत असताना देखील सदर औषध विक्रेत्यांकडून सोशल डिस्टंसिंग नियमांची पायमल्ली केली जात होती. सदर बाब डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांना कळताच त्यांनी दोन कारकून सोबत घेतले व त्या कारकुनांना ही कुठली कल्पना न देता स्वतः डमी ग्राहक बनून डहाणू शहरातले सदर औषध विक्रेत्यांच्या दुकानात जाऊन व सर्व खात्री केल्यानंतर सदर औषध विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई त्यांच्याकडून करण्यात आली. त्याच बरोबर काही चायनीज कॉर्नर व कपड्यांची दुकानांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली जे सायंकाळी ५ नंतर ही उघडे होते. सदर कारवाईत सुमारे पंचवीस हजार सातशे रुपये (२५,७००/-) दंड स्वरूपात वसूल करण्यात आले.

शहरातील भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, फॅक्टरी इत्यादी जे सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करत नाही अश्यांवर ही लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल. असं डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्या मानस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here