तेल्हारा शहरातील वाहतूक नियंत्रण विभागाची दंडात्मक कार्यवाही…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

तेल्हारा शहरातील अपघाती सत्राचे नियंत्रण थांबविण्यासाठी पोलीस वाहतूक नियंत्रण विभाग नेहमी आपल्या कामासाठी तत्पर राहते. तसेच बघता शहरातील प्रत्येक मुख्य ठिकाणी वाहतूक तपासणी रोजही सुरूच असते. सुरू असलेल्या तपासणीमुळे कित्येक चोरी गेलेली वाहनांची माहिती आपल्याला मिळालेली आहे.

गेल्या काही दिवसात आपण पाहिलेच आहे.नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी वाहतूक बद्दल नियम आणखीन कडक केले आहेत.ही नियमावली जनतेला त्रास देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या फायद्यासाठी अमलात आणले आहे.

आज रोजी शहरात दहा वाहनांवर कार्यवाही करण्यात आली, असून कर्तव्यदक्षक वाहतूक पोलीस ईश्वर भारसाकळे यांनी काही वाहनांचा पाठलाग करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या नागरिकांवर कसून कार्यवाही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here