कागलमध्ये विनाकारण फिरणाऱ्यावर पोलिसाकडून दंडात्मक कारवाई…

राहुल मेस्त्री…
कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आणि यामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने दिनांक 14 एप्रिल पासून पंधरा दिवसाकरीता संचार बंदीचे आदेश काढले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेसह कामगार वर्गाला कामावरती ये-

जा करण्यासाठी मुभा दिली आहे.तर या संचार बंदीला गेल्या पाच सहा दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरामध्ये चांगला प्रतिसाद मिळताना दिसत होते ….
मात्र सोमवार दिनांक 19 रोजी आठवडी बाजाराच्या दिवशी कागलमध्ये विना मास्क, विनाकारण फिरणाऱ्या रोड रोमिओ यांची संख्या अधिक प्रमाणात वाढल्याने येथील

खर्डेकर चौकात कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली कागल शहरातील विनाकारण, विना मास्क आणि विना लायसन्स फिरणाऱ्या रोडरोमियोवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे .त्याच बरोबर यामध्ये कारवाई करण्यात येत

असणाऱ्या दुचाकीस्वाराला विना मास्क, विनाकारण नफिरण्याच्या सूचना देखील कागल पोलिसाकडून देण्यात येत आहेत . तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गांभीर्य समजून घेऊन दुर्लक्ष न करता कागल करांनी कारणाशिवाय बाहेर पडू नये असे अहवान पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी केले .यावेळी कागल पोलीस स्टेशन मधील अनेक पोलिस अधिकारी या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत होते….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here