नो मास्क नो राईड मोहिमेत शहर वाहतूक शाखेची मास्क न घालणाऱ्या २०० चे वर दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई…

अकोला – शहर वाहतूक शाखेने मास्क न घालता दुचाकी चालविणाऱ्या चालकां विरुद्ध धडक कारवाई सुरू केली असून आज गांधी चौक, कोतवाली चौक, टॉवर चौक, जठारपेठ चौक, रतनलाल प्लॉट चौक येथे मोहीम राबवून २०४ मास्क न घालता दुचाकी चालविनाऱ्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली,

सदर मोहीम शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व त्यांचे कर्मचाऱ्यानी केली, दुचाकी चालक, ऑटो चालक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी स्वतः मास्क घालावे व विना मास्क ची प्रवासी वाहतूक करू नये आढळून आल्यास दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी वाहन चालकांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here