सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा…

सांगली – ज्योत मोरे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंहामडंळातील संघटन विरहित कर्मचाऱ्यांचा गेले दहा दिवसापासून हक्क अधिकारा साठी निरंतर संप सुरूच आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात त्वरित विलीनिकरण करा, आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे परिवाराला ५० लाख रुपये त्वरित देऊन परिवारातील सदस्याला परीवहन महामंडळात नोकरी दिले पाहिजे,

एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचे थकित करारासह पुढील करार त्वरित करा यासह अन्य मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत असे प्रतिपादन जिल्हा महासचिव (दक्षिण) उमरफारूक ककमरी यांनी केले. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, जिल्हा संघटक संजय कांबळे, सांगली शहर अध्यक्ष पवन वाघमारे, अनिल मोरे, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here