गल्लीतील वातावरण तंग….! सामान्य जनता पाहते निवडणुकीचे रंग…!

गटातटाचे राजकारण सुरू…
भाऊबंदकी आली चव्हाट्यावर…

गाव पॅनलच्या किंग मेकर चे अस्तित्व पणाला… सर्वच कार्यकर्ते लागले कामाला…. जनतेचा कौल कुणाला…अपक्षांनी लावली शक्ती पणाला…चौकाचौकात रंगली चर्चा…

बुलढाणा – अभिमान शिरसाट

गावच्या विकासासाठी तथा हितासाठी कार्यरत असणारी संस्था अर्थात ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होतात गाव पुढारी तथा उमेदवार हे आप -आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधात जय्यत तयारी करून विजयाची विजयश्री खेचून आणण्यासाठी कंबर कसून उभे ठाकले आहेत. आणि गावागावांमध्ये निर्माण झालेल्या गाव पॅनलच्या किंगमेकरनी आपली शक्ती पणाला लावून अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे.

आणि या सर्व घडामोडी मध्ये सर्वसामान्य जनतेला मात्र चव्हाट्यावर आलेली भाऊबंदकी पहायला मिळत आहे. जनतेचा कौल कुणाला…! ही चर्चा चौकाचौकात रंगत आहे. अपक्षांनी सुद्धा आपली शक्ती पणाला लावत कंबर कसून गाव पॅनल ला आव्हान दिल्याचे चित्र दिसत आहे.

निवडणूक रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारानी गावकरी तथा मतदारावर विकास कामाच्या आश्वासनाची बरसात सुरू केली आहे. या सर्व घटना तथा घडामोडी मध्ये मात्र गावकऱ्यांना दिल्लीच्या राजकारणापेक्षा गल्लीच्या राजकारणाचे रंगढंग बघायला मिळत असून गल्लीतील वातावरण तंग. सामान्य जनता पाहते निवडणुकीचे रंग. असे म्हणावयास वावगे ठरत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here