सांगली प्रतिनिधी– ज्योती मोरे
खासदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद मधील औरंगजेबाच्या कबरीवर चादर अर्पण करून त्या ठिकाणी नमाज पठण केले या त्यांच्या कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष पसरला असून अनेक राजकीय तसेच हिंदू प्रेमी, शिवप्रेमी लोकांनी आपापल्या प्रतिक्रियाही द्यायला सुरुवात केली आहे.
खासदार केलेल्या या प्रकारा विरोधात आज सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने जाहीर निषेध करत जोडे मारो आंदोलन केलं ओवेसींच्या या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांना जर आम्हाला चॅलेंज द्यायचा असेल तर आम्ही ते स्वीकारतो. त्या थडग्याचं काय करायचं ते आम्ही करतो परंतु औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही. याबाबतीत जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशाराही यावेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी खासदार ओबीसींच्या प्रतिमेला जोड्याने मारून निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेला पायदळी तुडवलं आहे.